संपादकीय

वंचित बहुजन आघाडीकरून मंत्री बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

 

शेतकरी प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे म्हणून प्रहार संघटनेचे कर्तेधर्ते तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांची ओळख आहे. अशातच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. पदाचा गैरवापर, बोगस कागदपत्राचा वापर तसेच कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या पदाचा वापर करत बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केला, असा धक्कादायक आरोप वंंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवान पुंडकर यांनी केला आहे.

तसेच पदाचा गैरवापर करत निधी अपहार करण्यासाठी यंत्रणांचा उपयोग केल्याचाही आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Back to top button