संपादकीय

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक थेट मनपा आयुक्तांना पत्र

 

मुंबई | लॉकडाऊन त्यामुळेवाडलेली बेरोजगारी आणि वाढती महागाई यामुळे सामान्य जनता त्रासली असताना वाढीव वीज बिलानेही सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान बेस्ट कंपनीकडूनही ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्राहकांच्या बाजूने येत महापालिका आयुक्तांची भेटही घेतली आहे.

याच वाढत्या बिलाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आयुक्तांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे.

बेस्ट कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला जो खर्च दाखवला आहे, प्रत्यक्षात तो खर्च न करता MERC कडून मंजूरी घेऊन बेस्टने परस्पर वीज दर वाढवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार बेस्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून देखील यावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे महापालिका आयुक्तांची भेट घ्यावी लागल्याचंही मनसे नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आता बेस्टची सतत असलेली शिवसेना क्या आय निर्णय गेले हे पाहावे लागणार आहे.

Back to top button