संपादकीय

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही’- शरद पवार

 

नाशिक: येथे सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला.समारोप कार्यक्रमात निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अजरामर आहे, असे पवारांनी स्पष्टपणे नमूद केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य अजरामर आहे. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर होत असलेल्या चर्चा चुकीच्या असून, अशा चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. ते अगदी योग्य आहे. अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. मराठी भाषा विषयक अडचणी समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचे ठरवले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Back to top button