बीड

तृतीयपंथीयांसोबत वृक्षारोपण करून-सुवर्णा सुतार यांचा वाढदिवस साजरा

तृतीयपंथीयांसोबत वृक्षारोपण करून-सुवर्णा सुतार यांचा वाढदिवस साजरा

बीड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेताजी वस्ती केंद्र खांडे पारगांव ता.जि.बीड येथे कार्यरत असलेल्या आदर्श शिक्षिका सुवर्णा सुतार यांनी बीड येथील विजयकुमार खंडोजी इंगळे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जय शिवराय बहूउद्देशीय सेवाभावी संस्था गोर्लेगाव संचलित ध्येयपूर्ती निवासी शैक्षणिक प्रकल्प याठिकाणी आपला वाढदिवस समाजाची बांधिलकी राखून बीड येथील तृतीयपंथी सपना व बाळू, मुस्कान, देविका व इतरांसोबत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.
बीड मधील तृतीयपंथी लोकांच्या समस्या काय असतात, त्या कशा सोडवता येतील याबाबत विचार करुन समाजापासून दूर असणाऱ्या या लोकांना माणसात आणून त्यांना मानसन्मान कसा देता येईल याबद्दल यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. सौ. सुवर्णा सुतार यांनी तृतीयपंथीयांसोबत वाढदिवस साजरा करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसावर व्यर्थ खर्च करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. यावर्षी पर्यावरणाचा व तृतीयपंथी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा नेताजीवस्ती येथे देखील वृक्षारोपण व मुलांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच उपस्थित मान्यवरांना झाडांची रोपे देवून झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण विषयक संदेश दिला. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. याप्रसंगी सतिश वराट, ज्ञानेश्वर कोठूळे, पंढरीनाथ नवले, श्रीकांत देशमुख, सचिन पिसाळ, विलास दुधाळ, संजय ठाकूर, गणेश जाधव, यशवंत जानवळे, दत्ता बनकर, विजय इंगळे, पांडुरंग काजगुंडे, अरुण उनवणे, वैभव धावडे, धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रुपाली देशपांडे, सुरेखा कागदे, वर्षा थिटे, जया सुरवसे, ट्रान्स जेंडर सपना-बाळू, मुस्कान, देवीका आदींची उपस्थिती होती.

Back to top button