बीड
सिंदफणेच्या पाणीप्रश्नासाठी शेतकर्यासह लढू- खा. रजनीताई पाटील

सिंदफणेच्या पाणीप्रश्नासाठी शेतकर्यासह लढू- खा. रजनीताई पाटील
तब्बल १४० गावचे शेतकरी एकवटले, १९ व्या दिवशी उपोषण स्थगित
कोळगाव – सिंदफणेचा पाणी प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांसह खांद्याला खांदा देऊन लढू, या पाणी प्रश्नासाठी लवकरच जलसंपदा मंत्री ची भेट घेऊ व शेतकऱ्यांना न्याय देऊ असा विश्वास खासदार रजनीताई पाटील यांनी व्यक्त केला. यानंतर गेल्या 19 दिवसापासून सिरसमार्ग येथे सुरू असलेले 140 गावातील शेतकऱ्यांची उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, भाऊसाहेब जरांगे पाटील, राजसाहेब काका पवळ, बाबुराव जेठे, शामराव घुगे, विजयकुमार करपे, डॉ. रमाकांत कुंभार, राजाभाऊ महाराज कुटे, लक्ष्मण काशीद, मधुकर नागरगोजे, काशीनाथ जोगदंड, आदीनाथ जोगदंड, गणेश कोळेकर, मोतीराम शेरकर, महेश गिराम, अशोक काळे, राजू शेख, राजेश तळेकर, सरपंच नवनाथ गवते, सरपंच नंदकुमार शिंदे, सरपंच चौधरी, सचिन पवळ, राहुल लोंढे, गणेश हाडुळे, रामदास महाराज निर्मळ, सरपंच कोळेकर, अण्णासाहेब वाणी, दिपक जाधव, अर्जुन पवळ, बंडू पवळ, मधुकर थोरात, मुकुंद परदेशी, अंकुश परदेशी, रंगनाथ पाबळे, उमेश पवळ, बालासाहेब शेरकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जायकवाडीच्या पाण्यासाठी सिंदफणा पट्ट्यातील 140 गावच्या शेतकर्यांनी लोकलढा आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनांतर्गत गेल्या 19 दिवसांपासून सिरसमार्ग येथे उपोषण सुरू होते. जायकवाडीचे पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडा, सिंदफणा नदी पात्रात साखळी बंधारे बांधावेत, जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा आदी मागण्यासाठी हे उपोषण सुरू होते. गेल्या 19 दिवसापासून या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान याची दखल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेऊन शेतकऱ्यांसह संवाद साधला. शुक्रवारी सिंदफणा पट्ट्यातील व लोकलढा आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांची महत्त्वाचे बैठक आयोजित केली होती. या शेतकऱ्यांशी खासदार रजनीताई पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी रजनीताई पाटील म्हणाल्या की सिंदफणात पाणी येईपर्यंत आपण शेतकऱ्यांसोबत हा लढा लढू तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊ. खासदार पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याने यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, भाऊसाहेब जरांगे पाटील, राजेसाहेब काका पवळ, बाबुराव जेठे, राजाभाऊ महाराज कुटे, श्रीनिवास बेदरे, गणेश बजगुडे, नायब तहसिलदार कट्टे यांच्या हस्ते महादेव रडे, देविदास चव्हाण, दिनेश गुळवे यांनी जल प्राषण करून उपोषण स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांसोबत काँग्रेस – सोनवणे
सिरसमार्ग येथे उपोषणकर्त्यांसमोर बोलताना रालुह सोनवणे म्हणाले, की शेतकरी रास्त मागण्यासाठी उपोषण करण्यास बसले असता त्यांची अठरा दिवस लोकप्रतिनिधी अथवा जिल्हा प्रशासनाने घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी मात्र खचून जाऊ नये, शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगून प्रकृतीची चिंता म्हणून उपोषण स्थगित करण्याचे सूचवले. याचा आदर शेतकर्यांनी उपोषण स्थगित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू- गुळवे
शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे म्हणाले की शासनाने शेतकर्यांच्या मागण्यांचा योग्य विचार करावा. सिंदफणात बारमाही पाणी नसल्याने शेती व शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शासनाने या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास येत्या दोन महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व १४० गावातील शेतकर्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा समन्वयक दिनेश गुळवे यांनी दिला.



