📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सनराईज शैक्षणिक संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा

सनराईज शैक्षणिक संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी: जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडशन संस्थेच्या सनराईज शैक्षणिक संकुलातील साहेबराव पाटील माध्य. विद्यालय, एम.ई. भोरे ज्यु. कॉलेज, व सनराईज इंग्लिश स्कूल च्या कॅम्पस मध्ये आज, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन‌ उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड/भोरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .सहशिक्षक चंद्रकांत सातपुते सर यांनी संविधाना बद्दल माहिती विद्यार्थांना सांगितली . मार्गदर्शनपर मनोगतात प्राचार्या सौ.जोगदंड म्हणाल्या की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे केवळ पुस्तकातील शब्द नव्हे; ते समानता, स्वातंत्र्य, बंधुता न्याय यांसारख्या जीवनमूल्यांचे अधिष्ठान आहे. ही मूल्ये आपल्या दैनंदिन वर्तणुकीत, कृतीत, व्यवहारात उतरली तरच संविधानाचे खरे पालन होईल. कार्यक्रमात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व सर्वांनी एकमुखाने भारताच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली.
.प्रा.सुनील घाडगे यांनी आभार मानले.या प्रसंगी संस्थेचे संचालक प्रा. तेजस भोरे,स्व.एम.ई. भोरे ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विनोद बहिर, प्रा.प्रदीप भोंडवे, प्रा.स्वाती पवार,प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा.छबिलाल गावित, प्रा.विवेक सातपुते तसेच साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयच्या सहशिक्षिका सुषमा भोरे मॅडम , शिक्षकेतर कर्मचारी महेश पाटील, हनुमंत वाघमारे, दिनकर सरगर, बुवासाहेब दहीकर. सनराईज इंग्लिश स्कूल पाडळीचे प्रिन्सिपॉल बिभिषण भोरे,व्हाइस प्रिन्सिपॉल भाऊसाहेब भोईटे,अर्चना गिरमे ,अंजली कात्रजकर, प्रतिभा कदम, सानिया सय्यद,कदम मॅडम,पुनम तुपेरे,यांसह शिक्षक-कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button