बीड

मंत्री धनंजय मुंडेंनी रेशन दुकानांमार्फत सर्वसामान्यांवर अन्याय करु नये-श्रीमती गुलरुख जहीन

मंत्री धनंजय मुंडेंनी रेशन दुकानांमार्फत सर्वसामान्यांवर अन्याय करु नये-श्रीमती गुलरुख जहीन

बीड (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व रेशन दुकानांवर गहूऐवजी खडे मिश्रीत ज्वारीचे वितरण करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची चेष्टा करण्याचे काम अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी करु नये, रेशन दुकानावर ज्वारीचे वितरण करण्यापेक्षा गहुचे वितरण करावे असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती गुलरुख जहीन (राणीताई) यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
गरीब सर्वसामान्यांचे कुटूंब हे रेशन दुकानावर मिळणार्‍या अन्नधान्यावर अवलंबून असते, सरकारने गरीबांची चेष्टा लावली असून गहूऐवजी खडे मिश्रीत ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्यामुळे नागरीकात संताप व्यक्त होत आहे. आगामी काळात मुस्लिमांचा पवित्र रमजान असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची कीट मिळत नाही, अन् अपेक्षाही नाहीत परंतु आहे ते चांगल्या प्रकारे अन्नाचे वाटप करावे हीच अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. सध्याची सरकार आंधळी असून तिला डोळे नाही अन् कानही नाही अशीच अवस्था झाल्याचेही श्रीमती गुलरुख जहीन  (राणीताई) यांनी म्हटले आहे.
अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन खराब ज्वारीचे वाटप बंद करुन चांगल्या दर्जाचे गहू वाटप करावेत व रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देवू नका असेही गुलरुख जहीन (राणीताई) यांनी पत्रकात म्हटले आहे.

Back to top button