अंबाजोगाई शहरातील युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

अंबाजोगाई शहरातील युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई शहरात काँग्रेस पक्षाची 25 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे मागिल काळात जवळपास सर्वच नेते काँग्रेस सोडून सत्ताधारी पक्षात गेल्याने अंबाजोगाई शहर व तालुक्यातून काँग्रेस संपली असे इतर पक्षातील नेते मंडळी म्हणत असतानाच शिवसंग्रामचे मा. युवक जिल्हाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांना शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब यांनी काँग्रेस मध्ये आणत माजी मंत्री अशोकराव पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी अभिजीत लोमटे यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर शहराध्यक्ष पदी असेफोद्दीन खतीब यांची निवड करताच ही जोडगोळी कामाला लागली असून काँग्रेस पक्षात अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी रावसाहेब घाडगे पाटील, युवा नेते इरफान कुरेशी शेख समद सय्यद सलमान सोहेल खान अँड अजमेर शेख ऍड सलीम शेख मोबीन शेख नियामत शेख यांच्यासह असंख्य युवकांनी माजी मंत्री अशोकराव दादा पाटील जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे युवा नेते आदित्य पाटील तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे शहराध्यक्ष असेफोड्डीन खतीब यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला असून काँग्रेस पक्षास आलेली मरगळ लोमटे व खतीब यांची जोडगोळी दूर करतील अशी चर्चा होताना दिसत आहे



