गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी संकल्प करून जीवनाचा उद्धार करावा – अरुण चिंतामणी

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी संकल्प करून जीवनाचा उद्धार करावा – अरुण चिंतामणी
गुरुपौर्णिमेनिमित्त ल.ना. होशिंग विद्यालयात माजी शिक्षकांचा सन्मान
जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेला उजाळा देत विद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींनी औक्षण करून माजी शिक्षकांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अरुण चिंतामणी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संकल्प करुन जीवनाचा उद्धार करावा. प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष दिलीप गुगळे यांनी सांगितले की, शिक्षकांमुळेच पिढी घडते. आई-वडील व गुरुंची पूजा करत आध्यात्मिक विचारांची जपणूक करावी.
या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब पारखे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी उपमुख्याध्यापक रमेश चांदेकर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, संचालक शिवाजी तंठक, माजी अध्यक्ष आनंदराव काशिद, विठ्ठल चव्हाण, शहाजी वायकर, शकुंतला गाडे, भरत लहाने, वरिष्ठ लिपिक ईश्वर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी प्राचार्य अनंता खेत्रे,उपमुख्याध्यापक रमेश चांदेकर तसेच विद्यार्थिनी शिवानी राळेभात व विद्यार्थी प्रणव वारे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रभावीपणे भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी केले व सूत्रसंचालन अनिल देडे तर आभारप्रदर्शन सुप्रिया घायतडक यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे,पोपट जगदाळे, कलाशिक्षक मुकुंद राऊत,विशाल पोले, उमाकांत कुलकर्णी, रोहित घोडेस्वार, आदित्य देशमुख, स्वप्निल जाधव, साईप्रसाद भोसले, स्वाती बांगर, स्वप्नाली घाडगे, शितल जगदाळे आदींनी परिश्रम घेतले.



