बीड

शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमदाराच प्रभुत्व म्हणजेच शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी.

शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमदाराच प्रभुत्व म्हणजेच शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी.
अंबाजोगाई:-नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने विद्यमान आमदारांना नगरपरिषद मार्फत आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचा कृती आराखडा तयार करता आला विकासात्मक दृष्टिकोनातून संवेदनासह मूलभूत गरजा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता आल्या हे आपण अनुभवतोय शहरांतर्गत रस्ते नाल्या पथदिवे या प्रमुख गरजा अतिशय दर्जेदार कामाच्या माध्यमातून सध्या होताना दिसत आहेत
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आमदार विरोधक सत्तेवर विराजमान झाल्यास सामान्य अंबाजोगाईकरांना शहरातील अनंत अडचणीचा सामना करावा लागतो हे सर्वांच्या लक्षात आले
गेल्या पंचवीस वर्षात नगर परिषदवर सत्ता असणाऱ्या सत्ताधारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांच्या मालमत्तेत झालेली वाढ त्यांचा उंचावलेला आर्थिक स्तर बघितला तर लक्षात येतं यां सर्वानी अंबाजोगाईकरांना किती प्रमाणात लुटलय
अतिक्रमणा बाबतीत दरवर्षी छुप्या दैनिकात जाहिरात देऊन यांनी स्वतःचे अतिक्रमण मालकी हक्कात घेतले शहरातील ओपन स्पेस नगरपरिषद भोगवट्यातील मोकळे भूखंड शहरातील मुख्य रस्त्यावर निर्माण केलेले गाळे कशाप्रकारे सर्वांनी संगणमत करून समसमान वाटप करून बळकावले या कालावधीत सामान्य नागरिकांचे अतिक्रमण मालकी रखण्यात प्रशासक असेपर्यंत कधीच आलेलं नाही
प्रशासक व आमदार यांच्या माध्यमातून आज सामान्य गौरगोरगरीब यांचे अतिक्रमण मालकी हक्कात आणण्याचे पुण्य केज विधानसभा मतदारसंघाच्या दबंग आमदार सौ नमिताताई मुंदडा तसेच शहरातील उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी या सर्वांनी झोपडपट्टीतील सर्वांचे अतिक्रमण कायम करून त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम अंगीकारून घरोघरी जाऊन त्यांना पट्टे पावती प्रमाणपत्र पोहोच करत आहेत
यामुळे शहरात अतिशय सामान्य गोरगरीब लोकांमध्ये झोपडपट्टी वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच शहरात विकासात्मक दृष्टिकोनातून मोठमोठे रस्ते बंदिस्त नाल्या पथदिवे अशा अनेक कामांना गती मिळत आहे याप्रसंगी मात्र विरोधक हातबल होऊन विनाशकाली विपरीत बुद्धी वापरत आहेत शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्रित रित्या येऊन तो साध्य केला पाहिजे परंतु आजपर्यंतच्या काळात असं झालं नाही
आमदार महोदयांना आमदार निधी टाकण्यासाठी कधीच सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदचा ठराव किंवा ना हरकत दिले नसल्यामुळे नगरपरिषद अंतर्गत शहराचा विकास होऊ शकला नव्हता
आज आमदार व प्रशासक असल्यामुळे शहरात चोहीकडे शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचण्याचा काम प्रशासन आणि आमदार करत आहेत हेच शहराच्या विकासाचे गणित असतं हे केवळ बुद्धिजीवी मतदारांना समजतं केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्यानुसारच राज्यातील त्या पक्षाच्या आमदारांना विजयी करण्यासाठी बुद्धिवान मतदारांचा कॉल असतो यातून विकासात्मक दृष्टिकोन सिद्धांत सिद्ध होतो
याच प्रकारे शहरातील राजकारण असायला हवं ज्या पक्षाचे आमदार त्याच पक्षाच्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था असल्या तर शेवटच्या घटकापर्यंत विकासाची हमी असते म्हणून येणाऱ्या काळात विकासात्मक दृष्टिकोनातून विरोधकांना घरी बसवण्याचं काम या बुद्धीजीवी मतदारांना सामान्य मतदारांनी दहा टक्के मतदारांनी सहकार्य केल्यास विरोधक सत्तेवर येऊ शकत नाहीत सामान्य मतदारांनी दृष्टिकोन बदलून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कर्तबगार आमदारांच्या सोबत राहून विरोधकांना सत्तेपासून रोखलं पाहिजे तरच अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी.
Back to top button