📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ; नव्या आराखड्यासाठी आदेश – आकाश बाफना

प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ; नव्या आराखड्यासाठी आदेश – आकाश बाफना

नगरविकास मंत्र्यांचा मोठा निर्णय – जामखेडचा आराखडा नव्याने तयार होणार

जामखेड प्रतिनिधी -जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांवर अन्याय करणारा असल्याने त्याविरोधात प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. धरणे, रास्ता रोको आणि जामखेड बंदच्या माध्यमातून नागरिकांनी विरोध दर्शवला.

विधान परिषद सभापती ( महाराष्ट्र राज्य) आ. प्रा. राम शिंदे यांनी नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन आराखड्याच्या त्रुटी दाखवून दिल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा अन्यायकारक आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नव्याने सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले.
या निर्णयामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, हा विजय प्रा. राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष आकाश बाफना यांनी सांगितले.

Back to top button