बीड

जामखेडकरांची अहिल्यादेवींना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना

जामखेडकरांची अहिल्यादेवींना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक जल्लोषात संपन्न

जामखेड प्रतिनिधी –पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड (कृषी उत्पन्न बाजार समिती) येथून सुरुवात झाली.

डिजेच्या तालावर, पारंपरिक वेशभूषा, पगड्या, पताका, हलगीच्या गजरात मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, पुष्पहार अर्पण आणि महाआरती करण्यात आली. संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि जल्लोषात पार पडली.कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती चे विकास मासाळ,मोहन (मामा) गडदे आदींनी परिश्रम घेतले.

“येळकोट येळकोट जय मल्हार”, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणांनी जामखेड शहर दुमदुमून गेले. या मिरवणुकीस माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, सरपंच अजय काशिद,भिमराव कापसे, संजिवनी पाटील, महारुद्र महारनवर,संचालक वैजिनाथ पाटील, डॉ. गणेश जगताप,सुरेश पवार, रविंद्र हुलगुंडे,मोहन देवकाते,उध्दव हुलगुंडे,अक्षय भोगे,नंदकुमार खरात, संतोष गव्हाळे, अभिजीत राळेभात, सचिन काशिद, पप्पू काशिद, गणेश सूळ,सचिन मासाळ, आनंद खरात, नागराज मुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राजमातांच्या कार्याचा गौरव करत जामखेड शहराने एकात्मतेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवले.

Back to top button