‘रामटेक’ वरील बाप्पांचे थाटात विसर्जन ; भक्तीभावाने निरोप देताना ना. पंकजाताई मुंडे भावूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री, आमदारांनी घेतले दर्शन : उद्योजक, सेलिब्रेटींही दाखल
मुंबई।दिनांक ३१।:-परपंरेनुसार पाच दिवसाच्या गणपतीचे आज ‘रामटेक’ निवासस्थानी प्रतिस्थापित केलेल्या पर्यावरण पूरक श्री गणेशाचे आज वाजतगाजत थाटात विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप देताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे भावूक झाल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्री, आमदार, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी रामटेकवर येऊन गणरायाचे दर्शन घेतले.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या मुंबई येथील ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थानी पहिलाच गणेशोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात आणि हर्षोल्हासात साजरा झाला. काल पाचव्या दिवशी परंपरे प्रमाणे श्री गणेशाचे विधीवत विसर्जन झाले. हा क्षण अत्यंत भावुक होता. बाप्पा रामटेक बंगल्याच्या बाहेर जाईपर्यंत पंकजाताई डोळयात पाणी आणून एकटक त्याच्याकडे पहात होत्या. ईश्वरभक्तीमध्ये तल्लीन झालेल्या या लोकनेतृत्वाचा भक्तीभाव पाहून सर्वांचेच मन हेलावून गेले होते.
*मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, आमदार, सेलिब्रेटींची गर्दी*
——
ना. पंकजाताई रामटेकवर रहायला आल्यानंतर पहिलाच गणेश उत्सव मोठया थाटात साजरा झाला. पाच दिवस गणेश भक्तांसह व्हीव्हीआयपी, सेलिब्रेटी, कलाकार, साहित्यीक यांची मोठी रेलचेल पहायला मिळाली. या काळात मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्यासह जवळपास दहा मंत्री आणि अकरा आमदार गणेशाच्या दर्शनासाठी येवून गेले. त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. मात्र महाराष्ट्राला या निमित्ताने पंकजाताईच्या अलौकिक लोकप्रियतेचे दर्शन घडले. या गणेश उत्सव काळात रामटेकवर भेट देणाऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, रा.स्व. संघाचे अ.भा.सह संपर्कप्रमुख सुनिलराव देशपांडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगपती सुबोध रुणवाल, सनदी अधिकारी अविनाश ढाकणे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन, रश्मी उध्दव ठाकरे, माजी आ. धिरज देशमुख, अभिनेता जॅकी भगनानी, मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीयमंत्री रक्षा खडसे, सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, शरद पवार यांचे जावई सदानंद मुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. श्वेता महाले, आ. अतुल भातखळकर, आ. मनिषाताई चौधरी, आ. योगेश सागर, आ.राज पुरोहित, आ. मिलिंद नार्वेकर, आ. विद्याताई ठाकुर, प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, पद्मश्री तात्यासाहेब लहाने, आ.प्रविण दरेकर, आ.प्रसाद लाड, आ. नमिता मुंदडा आदींचा समावेश होता. ना. पंकजाताई, मुलगा आर्यमान यांनी सर्वांचे स्वागत केले.



