म्हेत्रे घराण्याचा जामखेच्या राजकारणात २५ वर्षांनंतर नवा अध्याय -वैशालीताईं म्हेत्रे विजयी !

म्हेत्रे घराण्याचा जामखेच्या राजकारणात २५ वर्षांनंतर नवा अध्याय -वैशालीताईं म्हेत्रे विजयी !
जामखेड | प्रतिनिधी-कधी काळी ग्रामपंचायतीत नाव झळकवलेलं ‘म्हेत्रे’ घराणं… आणि त्यानंतर २५ वर्षांची शांतता. ती शांतता आज एका ठिणगीने पेटली – आणि ठिणगीचं नाव होतं भाजपा युवा नेते अर्जुन म्हेत्रे उर्फ दादा यांच्या सौभाग्यवती नगरसेविका वैशालीताई अर्जुन म्हेत्रे!
प्रभाग क्रमांक ९ मध्ये जनतेने जणू एक घोषणा केली ,वेळ आली आहे, इतिहास पुन्हा लिहिण्याची!
आणि त्या घोषणेनं वैशालीताईंना नगरपरिषदेकडे नेणारं दार उघडलं.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय रचनेतून भाजपाचा रंग जामखेडच्या आकाशात गडद होत असतानाच, प्रभाग ९ मधील हा निकाल जणू स्वतंत्र ‘म्हेत्रे अध्याय’ बनला.
प्रतिक्रिया देताना वैशालीताईंनी विश्वासाच्या मतांना उत्तर म्हणून काम आणि कामातूनच आपली ओळख आहे .
या विजयाबद्दल ओबीसी मोर्चा चे नेते शरद म्हेत्रे व युवा नेते अर्जुन मेहेत्रे यांचा आनंदही हटकेच,कारण हा विजय फक्त जागेचा नाही…
२५ वर्षांच्या शांततेचा, प्रतीक्षेचा आणि घराण्याच्या हृदयातील न सांगितलेल्या पानांचा ‘पहिला शब्द’ आहे.



