बीड

सारोळा प्रशालेतील स्वराज श्रीधर मुळे व शाश्वती राहुल लिमकर यांचे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन मध्ये सुयश….!

सारोळा प्रशालेतील स्वराज श्रीधर मुळे व शाश्वती राहुल लिमकर यांचे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन मध्ये सुयश….!

जामखेड (प्रतिनिधी):दिनांक 22 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत खेमानंद इंग्लिश मिडीयम स्कूल जामखेड या ठिकाणी विविध मान्यवर अतिथी,शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये 50 वे जामखेड तालुकास्तरीय विज्ञान,गणित व पर्यावरण प्रदर्शन उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.
सदर प्रदर्शनमध्ये उद्घघाटन प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी स्वराज श्रीधर मुळे याने जिल्हा विज्ञान अध्यापक संघ अहिल्यानगर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षा सन 2025-26 मध्ये विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल त्याचा सन्मान विधान परिषद सभापती मा.प्रा.श्री.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच सदर प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सारोळा प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी शाश्वती राहुल लिमकर हिने गणित विषय अंतर्गत संख्येचे प्रकार हे मॉडेल सादर केले.तिचा इ.1 ली ते इ.5 वी या लहान गटामधून गणित विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक आला.याबद्दल शाश्वतीला जामखेड नगरपरिषद नूतन नगराध्यक्षा प्रांजलताई अमितशेठ चिंतामणी, जिल्हा परिषद अहिल्यानगर माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,गटविकास अधिकारी शुभम जाधव ,गट शिक्षणाधिकारी श्री.प्रदिप चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये सन्मानित करण्यात आले.
सदर विद्यार्थांना मुख्याध्यापक माजीद शेख (इयत्ता सहावी वर्गशिक्षक),पदवीधर शिक्षक राहुल लिमकर (सायन्स शिक्षक),सुरेश बर्वे , उपाध्यपक प्रशांत होळकर, उपाध्यपिका अमृता रसाळ (इयत्ता पाचवी वर्गशिक्षक),शबाना शेख व सौ. वृषाली खांदवे यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये सुयश संपादन केल्याबद्दल,आदर्श सारोळा गावचे आदर्श सरपंच रितूताई अजयदादा काशिद, शिक्षण विस्ताराधिकारी जालिंदर खताळ ,राजुरी केंद्रप्रमुख विक्रम बडे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे व सर्व सदस्य,पालक यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन केले.

Back to top button