बीड

आम आदमी पार्टीच्या साध्या आणि डोर टु डोर प्रभावी प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद

आम आदमी पार्टीच्या साध्या आणि डोर टु डोर प्रभावी प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद
============================
आम आदमी पार्टीची नगरपरिषद निवडणूक प्रचार मोहीम मतदार बांधवांच्या मनापर्यंत पोहोचत असून, शहरभर या प्रचाराची सकारात्मक चर्चा सुरू आहे. कोणताही दिखावा किंवा गाजावाजा न करता, पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते डोर-टू-डोर पद्धतीने शांत, संयमी आणि साधेपणाने जनसंपर्क करत आहेत.
घराघरात पोहोचताना उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत पॅम्प्लेटच्या माध्यमातून पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांची माहिती देत आहेत.
त्यामध्ये –
 शिक्षण क्षेत्रातील घडवलेली क्रांती
 शेतकऱ्यांना मिळालेली हेक्टरी मदत
 आरोग्य क्षेत्रातील जनकल्याणकारी बदल
घरपट्टी हाफ – पाणीपट्टी माफ
 200 युनिटपर्यंत मोफत वीज योजना
यांसारख्या जनसामान्यांना थेट दिलासा देणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
शहरातील नागरिकांना आम आदमी पार्टीचा साधेपणा, पारदर्शकता आणि जनहिताचा दृष्टिकोन स्पष्टपणे भावत असून, त्यांच्या या शांत आणि मनापासून केलेल्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आम आदमी पार्टीची आतापर्यंतची कामगिरी आणि सुस्पष्ट कार्यपद्धती पाहता, मतदारांचा कल आम आदमी पार्टी कडे झुकत असल्याचे चित्र अधिक ठळकपणे दिसत आहे
Back to top button