बीड

अवैध दारू तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधि*भंडारा*:- स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथकाने अवैध देशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत एकूण ५४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली.
या प्रकरणात आरोपी नरेश शंकर गभणे (वय ४५), रा. धामनी, ता. पवनी, जि. भंडारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून टायगर ब्रँड संत्रा देशी दारूचे ९० एम.एल.च्या ४०० नग पव्वे (प्रत्येकी किंमत ३५ रुपये, एकूण किंमत १४,०००/- रुपये) तसेच एम.एच. ३६ एस. ६५६३ क्रमांकाची मोटारसायकल (किंमत ४०,०००/- रुपये) असा एकूण ५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अप. क्रमांक २८१/२०२५ अन्वये कलम ६५ (अ), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, व पोनि. चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. पंचबुधे व स्था. गु. शा. पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पवनीचे अधिकारी करीत आहेत
Back to top button