अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना बियाणे तर गरजूंना किराणा वाटप

शेतकऱ्यांना बियाणे तर गरजूंना किराणा वाटप
================
गेवराई दि.३१(प्रतिनिधी)
माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सादोळा, ता. माजलगाव येथील परमेश्वर साळुंके यांनी नांदलगाव, रामेश्वर आणि मालेगाव मजरा येथील ६२ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी बियाणांचे वाटप केले तर माजी जि.प. सदस्य संग्राम आहेर यांनी गरीब व गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करुन अमरसिंह पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सादोळा, ता. माजलगाव येथील परमेश्वर साळुंके यांनी नांदलगाव, रामेश्वर आणि मालेगाव मजरा येथील ६२ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी बियाणांचे वाटप केले तर माजी जि.प. सदस्य संग्राम आहेर यांनी उमापुर येथे गरीब व गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करुन अमरसिंह पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिलीपराव साळुंके, दत्तात्रय सादोळकर, गंगाधर नाईकनवरे, सोना बापू साळुंके, किशोर कुमार साळुंके, रमेश गाडे, श्रीपाद साळुंके, श्रीकांत साळुंके, पंढरीनाथ शिर्के, सुरज साळुंके, ज्ञानेश्वर गोरे, सरपंच योगेश गाडे, उपसरपंच जालिंदर घवाडे, अशोक शिंदे, धनजय राऊत, संतोष शिंदे, गुंडीराम शिंगाडे, श्रीकिसन राऊत, महादेव फरताडे, प्रकाश गायकवाड, ऋषी घवाडे, राम शिंदे, गोरख घवाडे,आबा घवाडे, तुकाराम घवाडे, संजय राठोड तसेच उमापुर येथे
माजी जि.प.सदस्य रावसाहेब देशमुख, भीमराव मोरे, तुळशीदास बापू औटी, शिवाजी कासे, शरद दादा आहेर, रफिक दादा सौदागर, बप्पासाहेब देवढे, वसिम सौदागर, अविनाश आहेर, यदाराव त्रिंबके, मदन देशमुख, विष्णू बापू दळवी, पप्पू झाळे ,शिवनाथ चव्हाण,असिफ सय्यद, संतोष कातखडे आदी उपस्थित होते.
आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते , ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते.



