बीड
मराठा आरक्षण ;गेवराईसह ग्रामीण भागात गुलालाची उधळण करुन फटक्यांची आतिषबाजी

मराठा आरक्षण ;गेवराईसह ग्रामीण भागात गुलालाची उधळण करुन फटक्यांची आतिषबाजी
मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश
—————
गेवराई :प्रतिनिधी:-मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून सरकारने मागण्या मान्य करुन जरांगे पाटलांनी “आपण जिंकलो” अशी घोषणा करताच शहरातील चौका चौकात तसेच ग्रामीण भागात मराठा समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला.
मराठा आरक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटलांनी लढा उभारलेला असून जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास अखेर यश आले असून मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे मनोज जरांगे पाटलांनी घोषणा करताच मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत जल्लोष साजरा केला. यावेळी गुलालाची उधळण, तोफासह फटाक्यांची अतिष बाजी करत जरांगे पाटलांचा विजय असो असा जयघोष करत गावागावात मोठा जल्लोष साजरा करताना मराठा बांधव दिसून आले. शासनाने मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने हा जल्लोष साजरा करण्यात येत असल्याचे मराठा समाज बांधवांनी यावेळी बोलताना सांगितले.
@ चौकट :-
*जरांगे पाटलांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य*
१)हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता
२) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबरअखेर मागे घेणार
३) सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू करणार
४) आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार 15 कोटींची मदत देणार
५) ५८ लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार



