बीड

माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांची उपस्थिती –  

माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांची उपस्थिती –
राहुल खंडागळे आणि सायेमा काझी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
गेवराई : गेवराई नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 च्या पोटनिवडणूकी साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने
राहुल जिजा खंडागळे आणि काझी सायेमा आकेफ यांनी भाजपाचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार ता. 25 रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवारी सकाळी अकरा वाजता
भाजपाचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक राहुल जिजा खंडागळे, सायेमा आकेफ काझी यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून, दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भगवती टॉकीज पासून पायी चालत रॅली काढून अर्ज दाखल केला.यावेळी युवानेते यशराज पंडीत,नगर परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. भगवानराव घुंबार्डे, नपचे गटनेते राजेंद्र राक्षसभूवनकर, माजी नगरसेवक एजाज भाई मेंबर, ज्येष्ठ पत्रकार अय्युब बागवान, सरपंच कैलासराव माने, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, ब्रम्हदेव धुरंधरे, बाळासाहेब सानप, राजू पठाण, माजेद भाई, नप सभापती शहेदाद भाई, बद्दुशेठ, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, मधुकर वादे,राजेश टाक,शिनुभाऊ बेद्रे, बबलु खराडे, नगरसेवक ज्ञानेश्वर भाले,माजी नगरसेवक भरत गायकवाड , लक्ष्मण चव्हाण,गणेश कानगुडे, बंडू निकम, शेख राजू, मतीन कुरेशी, बाबुभाई फिटर, यांच्यासह वार्डातील युवा मतदारांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती होती

Back to top button