बीड

सहा वर्षांच्या अदीना सय्यद हिचा पहिला रोजा

सहा वर्षांच्या अदीना सय्यद हिचा पहिला रोजा

जामखेड प्रतिनिधी: इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना 19 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्यात आत्मशुद्धी,संयम आणि भक्तीचा संदेश देत आहेत.

नमाज (प्रार्थना), रोजा (उपवास) आणि जकात (दान) यांचा काटेकोरपणे अवलंब करत हा महिना आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित केला जातो.
याच पवित्र वातावरणात खर्डा शहरात एक प्रेरणादायी प्रसंग घडला. येथील शहाबाज सय्यद यांची कन्या अदिना शहाबाज सय्यद हिने अवघ्या सहाव्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण करून भक्ती आणि संस्कारांचा सुंदर आदर्श घालून दिला.रमजानचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व रमजान हा इस्लामिक कालगणनेतील नववा महिना असून,या महिन्यात कुरआन शरीफ अवतरल्याची मान्यता आहे.रोजा म्हणजे केवळ अन्न-पाणी त्याग नव्हे,तर वाईट विचारांपासून दूर राहून संयम,करुणा आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग स्वीकारणे होय.गरीब-गरजूंची मदत करण्यासाठी जकात देणे ही देखील या महिन्याची महत्त्वाची शिकवण आहे.लहान मुलांना रोज्याची सवय आणि त्यामागील संस्कार शिकवण्यासाठी अनेक कुटुंबांमध्ये “पहिला रोजा” विशेष उत्साहात साजरा केला जातो.हा केवळ धार्मिक विधी नसून,पुढील आयुष्यात संयम आणि श्रद्धेचे बीज रोवण्याचा संस्कार असतो.कडक उन्हातही अढळ निर्धार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी,कडक उन्हाची चाहूल लागत असतानाही आदीनाने कोणतीही तक्रार न करता उत्साहाने आपला पहिला रोजा पूर्ण केला.इतक्या लहान वयात तिने दाखवलेली जिद्द आणि भक्ती पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही भारावून गेले.इफ्तारचा आनंदोत्सव
संध्याकाळी रोजा सोडण्याच्या वेळी (इफ्तार) कुटुंबीयांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विविध फळे,स्वादिष्ट पकवान आणि आनंदमय वातावरणात अदिनाचा फुलांच्या माळांनी सत्कार करण्यात आला. इतक्या लहान वयातही रोजा सारखा कडक उपवास केल्याबद्दल सय्यद सर यांचे आदिनाथ सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.या प्रसंगी उपस्थितांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button