बीड
सौ. के.एस.के. महाविद्यालयास प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षणात विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त

बीडः प्रतिनिधी ः सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या कडून प्रशासकीय व शैक्षणिक अंकेषणामध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. सदर अंकेक्षण प्रकियेत ऑनलाईन पध्दतीने महाविद्यालयातील अभ्यासक्रम व शैक्षणिक नियोजन, अध्यापन व मुल्यमापन पध्दती,संशोधन व नवोउपक्रम, पायाभुत सुविधा, विद्यार्थी सहाय्यता, प्रशासन व नेतृत्व आणि गुणवत्ता या सातही निकषावर महाविद्यालयाची सखोल तपासणी करण्यात आली. सर्वच निकषामध्ये महाविद्यालयाची कामगिरी समाधानकारक व दर्जेदार आढळून आल्याने अंकेक्षण समितीने महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पध्दती, अद्यावत अभ्यासक्र, आधुनिक प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय, आयसिटी सुविधांचा प्रभावी वापर, संशोधनास प्रोत्साहन, विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच प्रशासनात पारदर्शकता, नियोजनबध्द कार्यपध्दती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून सातत्याने गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबविले जातात.
या उल्लेखनीय यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ. भारतभुषण क्षीरसागर, सहसचिव डॉ. दिपाताई क्षीरसागर, सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. टी. देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ. ए.एस.खान, आयक्युएसी समन्वयक डॉ. सोनाजी गायकवाड व प्रशासकीय व शैक्षणिक अंकेषणाचे समन्वयक डॉ. शंकर राउत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.