बीड
मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने भागवत मसने सन्मानित

मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने भागवत मसने सन्मानित
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बालाजी देशमुख:- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे नुकतेच अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध साहित्यिक, वात्रटिकाकर, आदर्श शिक्षक भागवत मसने ह्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी भागवत मसने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष पदी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव , प्रा दिलीप तरकसे, आदर्श सरपंच जगताप, पोलीस उपनिरीक्षक जाधवर हे उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्याच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दिलीप तरकसे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात तरकसे यांनी या पुरस्काराविषयीची कारणमीमांसा विषद केली. आपला समाज आज विविध क्षेत्रात विविध नवंरत्नांनी भरलेलाआहे. या नवरत्नाना त्यांनी केलेल्या कामाची पावती देने किंवा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. तर
आपल्या सत्काराला उत्तर देताना भागवत मसने यांनीही आमच्या कामाची दखल घेणारे व आमच्याही पाठीवर थाप देणारे कोणीतरी आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. या पद्म पुरस्काराने आम्हाला पुन्हा काम करण्यासाठी प्रेरणा मिळते आहे अशी भावना व्यक्त केली.
भागवत मसने यांनी आजपर्यंत अनेक कविता, वात्रटिका, बडबड गीते, गीते, पथनाट्ये, यासोबतच एकांकिका लेखन यासोबतच विविध ठिकाणी स्नेहसंमेलन, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये परीक्षक म्हणून देखील मागील अनेक वर्षे ते काम करत आहेत. त्याच्या याच कार्याची व साहित्याची दखल घेऊन बीड येथे राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने आदर्श शिक्षक, वात्रटिकाकार, तथा जेष्ठ साहित्यिक भागवत मसने यांना गौरविण्यात आले. त्याचा या पुरस्काराबद्दल मसने सरांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



