बीड
पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेब यांच्या हस्ते पुजा करून वारकर्यांना अल्पोपहार व महाप्रसादाचे वाटप

पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेब यांच्या हस्ते पुजा करून वारकर्यांना अल्पोपहार व महाप्रसादाचे वाटप
बीड (प्रतिनिधी) – श्रीसंत मुक्ताईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूर कडे रवाना होत असताना दोन दिवसांसाठी बीड शहरात मुक्कामी असते, यावेळी बीड शहरातील भाविक मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करत वारकरी बांधवांच्या सेवेतच विठ्ठलाचे दर्शन करत असतात.
बीड शहरातुन पंढरपुरकड़े प्रस्थान करते वेळी सामाजिक क्षेत्रातील संकल्प युवा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पालखीचे हर्षोल्लासात मध्यवर्ती बसस्थानक समोर स्वागत करण्यात आले. हा पालखी सोहळा शहरातील माळीवेस चौक, सुभाष रोड, बसस्थानकमार्गे वारकरी दिंड्या, पताका, ध्वजकरी, विठूरायाचे नामस्मरण करीत कपिलधार येथील मंदिरात मुक्कामी जातात. यावेळी वारकर्यांना संकल्प युवा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने बस स्थानक समोर हॉटेल अन्नपूर्णा येथे फराळाचे वाटप करण्याची परंपरा गेल्या 10 वर्षी पासुन अवितरपणे चालू आहे. याहीवर्षी शिवाजीनगर पोलिस निरीक्षक श्री. किशोर पवार साहेब यांच्या हस्ते पुजा करून अल्पोपहार वाटप करण्यात आला आहे, यावेळी पालखी सोहळ्याचे संस्थानप्रमुख ऍड. रविंद्र पाटील, दिंडीचे प्रमुख हरणे पाटील, महंत श्री. अमृताश्रम महाराज, पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेब, किशनसिंग चौहान यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून आदरयुक्त सत्कार प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीसंत मुक्ताईंच्या पालखीची महाआरती प्रतिष्ठानचे प्रमुख संतोष मेहता,प्रशांत डोरले, तिलक झाडीवाले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्याला फराळ म्हणून केळी, चिवडा, राजगीरा लाडू, चिप्स असे विविध फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक व सर्व व्यापारी सह प्रतिष्ठानचे सदस्य कृष्णा जाधव, बाबासाहेब वणवे, रवी देवकर, करण पाबळे, जयराज जाधव, हर्षवर्धन पाटील, प्रवीण मते, आदित्य नवले, वैभव काळे, श्रेय जैन, यशराज जाधव, देवेश जैन सह अन्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.



