📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

एच.पी.एम. कंपनीला धक्का! सूर्योदयने उघड केलं बोगस बांधकाम – आता युद्धपातळीवर दुरुस्तीच काम सुरू

एच.पी.एम. कंपनीला धक्का! सूर्योदयने उघड केलं बोगस बांधकाम – आता युद्धपातळीवर दुरुस्तीच काम सुरू
केज/प्रतिनिधी :-केज बस स्थानका समोरील नव्याने बांधण्यात आलेला पूल वाहन जाण्याआधीच खचल्याची गंभीर घटना सूर्योदय पेपरने उजेडात आणताच प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपनी एच. पी. एम.कंपनीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या बातमीचा मोठा सामाजिक परिणाम दिसून आला असून, तातडीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सूर्योदय पेपरने (२३ जून) प्रकाशित केलेल्या “केज बसस्थानका समोरील पूल वाहन जाण्याअगोदरच खचला: प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण” या बातमीमुळे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गाफीलपणावर प्रकाश टाकण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक होते.
सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि कामगार घटनास्थळी दाखल झाले. खचलेला भाग हटवून त्याखालील सळ्यांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तुटलेल्या सळ्यांच्या जागी नव्याने सळ्या टाकून मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी यंत्रसामग्रीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     ही बातमी माध्यमातून प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये सूर्योदय पेपरबाबत कौतुकाचे सूर ऐकू येत आहेत. “जर ही बाब उघड झाली नसती, तर उद्या एखादा जीव गेला असता, आणि कोणीही जबाबदारी घेतली नसती,” असे स्थानिक नागरिकांनी नमूद केले.
सार्वजनिक निधीवर उभारण्यात येणाऱ्या अशा बांधकामांमध्ये हलगर्जीपणा किंवा बोगस साहित्य वापर होणे ही गंभीर बाब आहे. माध्यमांच्या सतर्कतेमुळेच हे प्रकरण वेळेत उघड झाले. प्रशासनाने यापुढे कोणत्याही बांधकामासाठी दर्जेदार तपासणी व खात्रीची प्रक्रिया राबवली पाहिजे.
Back to top button