राजकीय

सत्तेची रस्सीखेच,  मात्र भुर्दंड सामान्य नागरिकांना….!

 

राज्यात तीन पक्षाची सत्ता स्थापन झाल्यावर अवघ्या काही दिवसात राज्यावर कोरोना रुपी राक्षसाचे काळे ढग संपूर्ण पसरले होते यात अनेकांनी आपला जवळचा व्यक्ती सुद्धा गमावला होता एकीकडे जगभरातील अनेक देश यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असताना मात्र दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्धच सुरू झालेले पाहायला मिळाले होते.

एकीकडे देशात संसर्ग वाढत असताना विशेष करून याची झळ महाराष्ट्राला अधिक प्रमाणात बसत असतांना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिकलफेक करून आपलं खरं राजकीय रूप जनतेसमोर दाखवत होते मात्र या राजकारणाशी या जनतेचा काय संबंध ? राज्यातील प्रत्येक व्यक्ती टॅक्सच्या रूपाने राज्याच्या तिजोरीला हातभार लावत असतो मग सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणाचा सामान्य माणसांना का फटका बसावा.

आज सरकार म्हणून सत्तेत बसलेले काही काम करत असताना त्यातील दोष बाजूला काढण्याचे काम विरोधकांचे असताना त्याच उणीवा आणि दोष जगासमोर दाखवून आपल्याच महाराष्ट्राला का बदनाम करायचे काम सुरू आहे. अस म्हणतात की सत्तेची खुर्ची कोणचं कायमस्वरूपी घेऊन जन्म घेत नाही त्यावर आज ना उद्या विरोधात बसलेले सत्तेच्या खुर्चीवर बसणारच आहे पण सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या गलिच्छ राजकारणाला आत तरी ब्रेक लागलाच पाहिजे…!

Back to top button