बीड

शिस्त आणि समर्पणाचे प्रेणेते बळीराम अवसरे – शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

शिस्त आणि समर्पणाचे प्रेणेते बळीराम अवसरे – शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुख्याध्यापक बळीराम अवसरे सरांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

जामखेड दि.१३ -बळीराम अवसरे हे शांत, शिस्तप्रिय व समन्वयक वृत्तीचे आदर्श शिक्षक होते. त्यांनी नेहमीच शिक्षकांमध्ये एकता, सहकार्य व सकारात्मक वातावरण निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले.शिस्त आणि समर्पणाचे प्रेणेते बळीराम अवसरे असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद लातुरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी काढले.
तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळीराम पांडुरंग अवसरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी साईबन मंगल कार्यालय येथे सकाळी ११.०० वाजता उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद लातूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर हे होते. यावेळी बाळासाहेब तापकीर, डॉ.संजय राऊत,ऋचा अवसरे,मुकुंदराज सातपुते, धनराज पवार आदींनी अवसरे सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बळीराम अवसरे व त्यांच्या सौभाग्यवती उषा अवसरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने व संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दशरथ हजारे, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर,भाजपा नेते बापुराव ढवळे, उमेश रोडे,माजी प्राचार्य ज्ञानदेव कुंभार,डॉ.संजय राऊत,माजी व्हाईस चेअरमन अर्जुन शिरसाट,मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, केंद्रप्रमुख राम निकम, सुरेश मोहिते,लेखक एकनाथ चव्हाण, गोकुळ गायकवाड, प्रविण गायकवाड,डॉ.राजेंद्र पवार, सरपंच बाळासाहेब खैरे,उद्योजक संजय हजारे,पांडुरंग मोहोळकर, मनोहर इनामदार, बाळू जरांडे,केशवराज कोल्हे, जितेंद्र बोरा,राजेंद्र ओमासे,रामचंद्र गाढवे ,बाळासाहेब औटे,अविनाश नवसरे,सचिन पवार, धिरज उदमले, शिवाजी पवार,संजय हजारे,भिमा बोरुडे,नितीन शिंदे,प्रशांत कुंभार, केशव हराळे, अशोक कारंडे, धनंजय कारंडे,तालुकाध्यक्ष छाया जाधव,जयश्री पाटील,जया चौभारे, सुजाता राक्षे,निता तांबे,कल्पना ससाणे, मंजिरी गाढवे,शिवाली डुचे, राज्य संघाचे अनिल टकले, संजय घोडके,मिनिनाथ देवकर तसेच बळीराम अवसरे सरांच्या मातोश्री जिजाबाई अवसरे,पत्नी सौ.उषा अवसरे,मुलगा शुभम अवसरे,सून ऋचा अवसरे,मुलगी आकांक्षा म्हेत्रे व जावई अविनाश म्हेत्रे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अवसरे व सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम तर आभार प्रदर्शन आकांक्षा म्हेत्रे यांनी मानले.

Back to top button