बीड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रक्तदान शिबीर यशस्वी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रक्तदान शिबीर यशस्वी

शिव , महावीर फुले,आंबेडकर,जयंतीनिमित्त
रक्तदान करून दिली आदरांजली

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज, भगवान महावीर कल्याणक, महात्मा जोतिबा फुले आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जामखेड तालुका (केशव रात्र शाखा) यांच्यावतीने शहरातील महावीर भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक आणि स्वयंसेवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदात्यांनी या महान विभूतींना एक प्रकारे आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमास जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,उद्योगपती रमेश गुगळे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,सचिव शरद शिंगवी, आनंद गुगळे, बाजीराव गोपाळघरे,युवा उद्योजक आकाश बाफना, पिंटू बोरा, नगरसेवक अमित जाधव,संध्या सोनवणे,सुरज पवार,भास्कर गोपाळघरे, तुषार बोथरा,बाळासाहेब गोपाळघरे आदी मान्यवर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमात जैन श्रावक संघ, जामखेड यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रम प्रसंगी संघाचे जामखेड तालुका सहकार्यवाह योगेश औचरे म्हणाले, “शांती आणि समतेचा संदेश या महामानवांनी दिला आहे. तो आपण प्रत्येकाने आपल्या आचरणात आणला पाहिजे. हे रक्तदान शिबीर म्हणजे त्यांच्याप्रती आमची एक छोटीशी मानवंदना आहे.”

Back to top button