बीड
धनादेश न वटल्या प्रकरणी शिवाजी आसराजी वाघ यांना सहा महीने व सात लाख रु दंडाची शिक्षा

धनादेश न वटल्या प्रकरणी शिवाजी आसराजी वाघ यांना सहा महीने व सात लाख रु दंडाची शिक्षा
बीड (प्रतिनिधी ) :-अनादरीत धनादेश (चेक बाउन्स) प्रकरणात बीड येथील अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांनी महत्वपुर्ण निकाल देत बीड शहरातील प्रतिष्ठित शिवाजी आसराजी वाघ यांना सहा महीने कारावास तसेच 7 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.आरोपीने त्याचे मालकीचे धांडे गल्ली येथील घर फिर्यादी रामेश्वर चंद्रकांत पवार व संदिपकुमार नवनाथराव साळुंके यांच्याशी विक्री करार केला होता, फिर्यादी व संदिपकुमार यांनी प्रत्येकी पाच लाख रु. आरोपीस धनादेशाद्वारे दिले होते. आरोपीने आणखी पाच लाख रुपयांची मागणी केले वरून फिर्यादीचे मित्र संदिपकुमार यांनी परत पाच लाख रुपये रोख दिले होते. आरोपीने व्यवहारापेक्षा जास्तीची रक्कम घेऊन देखील घर मिळकत फिर्यादी व त्याचे मित्र संदिपकुमार यांच्या नावावर केली नाही.
फिर्यादीने आरोपीस रकमेची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीस देणे लागत असलेल्या कायदेशीर रकमेच्या रकमेपोटी धनादेश दिला, तो बँकेत वटवण्यासाठी टाकला असता चेक अनयुजेबल अश्या शेऱ्यासह न वटता परत आला. फिर्यादी यांनी आरोपीस नोटीस देऊन देखील आरोपीने रक्कम परत केली नाही, म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली. फिर्यादी यांनी सबळ पुराव्या द्वारे त्यांची फिर्याद मा. न्यायालयात सिद्ध केली. फिर्यादीच्या वकिलांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त मुख्य न्याय दांडधिकारी साहेब यांनी आरोपीस सहा महिने कारावास व नुकसान भरपायी पोटी सात लाख रुपये देण्याचे आदेश दिले. फिर्यादी तर्फे ऑड. विवेक डोके यांनी कामकाज पाहिले, त्यांना ऑड. राजेश जाधव, ऑड. सतिष गाडे, ऑड. रुचके, ऑड. सुधीर जाधव यांनी सहकार्य केले.



