बीड

गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेला २ कोटी २३ लाखांचा निव्वळ नफा

गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेला २ कोटी २३ लाखांचा निव्वळ नफा
गेवराई | प्रतिनिधी
गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्यात आला. संस्थेने चालू आर्थिक वर्षात तब्बल २ कोटी २३ लाख ७० हजार ५०६ रुपयांचा निव्वळ नफा मिळविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन अर्जुनराव बारगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभासदांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभासदांची वाढती आर्थिक गरज लक्षात घेऊन नियमित कर्ज मर्यादा १८ लाख रुपयांवरून २२ लाख रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आला.
यावेळी व्हा. चेअरमन विष्णू आडे, मानद सचिव दाभाडे, ज्येष्ठ संचालक तथा माजी चेअरमन सुभाषराव शिंदे, विष्णूजी खेत्रे, माजी सचिव बाळासाहेब दहिफळे, अर्जुनराव जाधव, माजी व्हा. चेअरमन दक्षाताई वानखेडे, संगीताताई कावळे, शारदाताई ननवरे, संचालक जितेंद्र दहिफळे, विकास घोडके, नितीन तिबोले, विशाल कुलकर्णी, भास्कर सोलाट, तज्ञ संचालक शिवाजी झेंडेकर तसेच संस्थेचे ऑडिटर सुनीलजी चव्हाण उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे व्यवस्थापक राजाभाऊ शिंदे यांनी आर्थिक ताळेबंद व वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेची सातत्याने होत असलेली प्रगती ही चेअरमन, व्हा. चेअरमन, मानद सचिव, संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांच्या पारदर्शक आणि कार्यक्षम कारभाराचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यामध्ये कनिष्ठ लिपिक सुनील कांबळे, नाईक अशोक मोटे आणि दादासाहेब खंडागळे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेच्या या उल्लेखनीय आर्थिक यशाबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
Back to top button