बीड
गायरान जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही — पप्पू कागदे

गायरान जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही — पप्पू कागदे
गायरान जमिनीसाठी राज्यात लढा उभारणार — पप्पू कागदे
अंबाजोगाई/प्रतिनिधी
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली गायरान जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी आगामी काळात राज्यात मोठा लढा उभारणार तसेच अतिक्रमित गायराण जमिनीवरील भूमिहीनांचे अतिक्रमणे नियमित करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पप्पू कागदे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
दि. ३१ मार्च रोजी अंबाजोगाई तालुक्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांनी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथे राघव हॉल मध्ये गायरानधारक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
या वेळी दिलीप जोशी, राजू जोगदंड, दीपक कांबळे, सचिन कागदे, रवी जोगदंड, दशरथ सोनवणे, दशरथ शिंदे, शरद मस्के, कार्तिक कांबळे, राणी गायकवाड, कपिल कागदे, गौतम बचुटे, निलेश ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पप्पू कागदे म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्प आणि विविध प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याला आम्ही प्रखर विरोध करणार असून यासाठी लवकरच राज्यामध्ये गायरान जमिनीचा लढा उभा करणार असल्याची घोषणा पप्पू कागदे यांनी केली. तसेच अनेक वर्षा भूमिहीन कास्तकार कसत असलेल्या अतिक्रमित गायरान जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी करण्यात येणार आहे. कागदे यांनी कार्यकर्त्यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी पार्टीचे विचार तळागाळात रुजवून सर्व जाती धर्मांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊ पक्ष तळागाळा पर्यंत रुजविण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले.
प्रमुख पाहुणे राजू जोगदंड, दिलीप जोशी, दीपक कांबळे, दशरथ शिंदे, राणी गायकवाड यांनीही पक्ष संघटन आणि सामाजिक चळवळ या बाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्याला राहुल गंडले, विलास वाघमारे, मधुकर कसबे, कोमल मस्के, करण साळवे, मा. मा. यशवंत पट्टेकर, राहुल जोगदंड, गणेश कसबे, किरण खंडागळे यांच्यासह
उमेश बचाटे, भाऊ कोरडे, शिलालाई नागेश मस्के, निताताई राजेभाऊ गायकवाड, शितलताई शुक्राचार्य गायकवाड, कांताबाई दगडू गायकवाड, शोभाताई बनसोडे, सिंधुताई वाघमारे, शांताताई कांळुंके, सुरेखाताई इंगळे, मधुर वासुद, विकास सुरवसे, सुरेश कांबळे, गणेश टेकरले, सोमेश्वर गंडले, विलास भागवत, सागर ओगले, विकास जोगदंड, भाऊराव होके, मनिष आदमाने, संकेत गोरे, विनोद आदमाने, महादेव पोटभरे, प्रभाकर आदमाने, प्रशांत भालेराव, विश्वास जोगदंड, तात्याराव जोगदंड, गोविंद टेकाळे, शेषेराव काशिकर, महादेव काशिकर, दयानंद भालेराव, महेंद्र गंडले, गोविंद टेकाळे, जनार्दन ओठले, हरिभाऊ ओठले, सुरज गव्हाणे, अमोल जोगदंड, राजेभाऊ भागवत, संतराम सुरवसे, नंदु भागवत, आण्णा भागवत, तथागत मस्के, मिलिंद वाघमारे, चंदु वाघमारे, राजेभाऊ मस्के, कुमार जोगदंड, संदिपान गायकवाड, मोहन क्षीरसागर, अशोक वाघमारे, ईश्वर मस्के, विजय इंगळे, अंबादास पोटभरे, विजय पोटभरे, बलभिम हजारे, कालिदास हजारे, इश्वर पोटभरे, युवराज कांबळे, बंड कांबळे, विक्रम ओटले, चेतन कांबळे, आकाश भालेराव, राजरल भालेराव, बाळासाहेब भालेराव, अतुल जोगदंड, समाधान जोगदंड, शुष्टधन जोगदंड, अशोक कांबळे, प्रकाश खरात, वैजनाथ ओठले, लखन होके, प्रशांत होके, शिवचरण सातपुते, किशोर सुरवसे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते आणि गायरानधारक मोठ्या संख्येने हजर होते.
______________________________
पोलिस पाटलांचा सत्कार :- अंबाजोगाई तालुक्यातील सर्व नवनियुक्त पोलिस पाटील यांचा यावेळी पप्पू कागदे यांनी संविधान देऊन सत्कार केला.



