बीड

शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे पाचेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे पाचेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
===============
गेवराई दि.१९ (प्रतिनिधी) गेवराई येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्युटघ्या वतीने गुरुवार दिनांक २१ मे रोजी पाचेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत होणाऱ्या या शिबिरामध्ये दाताची आरोग्य तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी, बालकाच्या आजाराची तपासणी, बी.पी/ शुगर तपासणी, रक्त व लघवी तपासणी करण्यात येणार असून गोळ्या व औषधी मोफत वाटप करण्यात येणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाचेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button