संपादकीय

एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे स्पष्टपणे चहापाणी नाकारलं’

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा मागच्या दोन आठवड्यापासून संप सुरु आहे याच पार्श्वभूमीवरआज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेत संपावर चर्चा केली आहे. या संपावर तोडगा काढण्यासंदर्भात त्यांनी शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं. दुसरीकडे एसटी कामगारांच्या शिष्टमंडळानेही शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीवेळी कामगारांनी शरद पवारांचे चहा-पान नाकारल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, शरद पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळही भेटल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. आता, तरी सरकारने कामगारांचा आक्रोश जाणून घ्यावा, असेही सदावर्ते यांनी सूचवले आहे.

‘दत्ता सामंतांच्या खुनानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा कष्टकऱ्यांसोबत उभा राहिला आहे. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंना मी सुचवायला आलोय, कारण जिवंतपणा हा तरुण आणि ताठर होत चालला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना हे सांगावं की, शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे चहा आणि पाणी स्पष्टपणे नाकारलं. यावरुन, आता महाराष्ट्र कशारितीने कामगारांच्या पाठिशी उभा राहतोय,’ असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

Back to top button