संपादकीय

डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल, मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

 

मुंबई | मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या खुल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना रोखठोख उत्तरे देऊन येणाऱ्या वर्षात महाविकास आघाडी महाराष्ट्राचा कसा आणि कोणत्या प्रकारे विकास करणार यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबई, ठाण्यात फक्त झोपड्या नाहीत. तर चाळीदेखील आहे. त्याचा पुर्नविकास करणं गरजेचं आहे. पुढील २-३ वर्षात या चाळींचा विकास केला जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतुक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असा विश्वास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबई ठाण्याचा कायापालट झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येणार आहे.

पया मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विकासावर बोलतोय, त्याचा आनंद वाटतो. कारण विकासावर बोलणं गरजेचे आहे. राज्यात रोज काही ना काही मोठं काम होत असतात. विकासकामाचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर रस्ते प्रकल्प, मेट्रो प्रकल्प असं दिसतं परंतु बाहेर परदेशात पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा म्हणजे विकास आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button