बीड

दामिनी पथकाची मुलींच्या सुरक्षिते संदर्भात जामखेड शहराला अचानक भेट

दामिनी पथकाची मुलींच्या सुरक्षिते संदर्भात जामखेड शहराला अचानक भेट

अनावश्यक त्रास झाल्यास विद्यार्थिनींनी 112 टोल फ्री क्रमांक डायल करावा आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. – महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रियंका पवार

जामखेड :- दि 24 एप्रिल 2025

पोलीस अधीक्षक कार्यालय भरोसा सेल अहिल्यानगर, दामिनी / निर्भया पथक अंतर्गत
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रियंका आठरे भरोसा सेल यांच्या सूचनेनुसार जामखेड शहरातील विविध शाळा महाविद्यालय यांना अचानक भेट देण्यात आली.
जामखेड शहरांमधील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय ,ल ना होशिंग विद्यालय , जामखेड महाविद्यालय , खेमानंद इंग्लिश स्कूल व विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले.
या वेळी भरोसा सेल दामिनी पथकाचे पोलीस हवालदार प्रियांका पवार , पोलीस हवालदार बाळासाहेब पोकळे, पोलीस हवालदार सचिन कोळेकर प्राचार्य मडके बी के , प्राचार्य बाळासाहेब पारखे , मुख्याध्यापिका भोर आर आर, मुख्याध्यापक वेल एस
एम,उप मुख्याध्यापक ढाळे ए ए उपमुख्याध्यापक नाळे एस ए, पर्यवेक्षक विकास कोकाटे पर्यवेक्षक संजय हजारे एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलीस हवालदार प्रियंका पवार यांनी विद्यार्थिनींना प्रवास करताना किंवा शाळेमध्ये बसमध्ये क्लासला येता जाता किंवा रोडने कोणी छेडछाड करत असतील तर 112 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा. तुम्हाला होणाऱ्या त्रासाची माहिती दिल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल.
जर कोणी व्यक्ती त्रास देत असेल ती माहिती लपून न ठेवता पालक आई वडील शिक्षक किंवा पोलीस प्रशासनाला निर्भीडपणे माहिती द्यावी. आपण माहिती दिल्यास आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करता येते.
तसेच चांगला स्पर्श वाईट स्पर्श याची माहिती दिली . कोणी वाईट स्पर्श करत असतील तर त्याची माहिती पालकांना द्यावी.
व मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करू नये. त्रास सहन करणे हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे.
अशी माहिती दिली.
पोलीस हवालदार सचिन कोळेकर व पोलिस हवालदार बाळासाहेब पोकळे यांनी सायबर क्राईम व तसेच सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळावा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो व अनावश्यक त्रास सहन करावा लागतो यासाठी आपली माहिती तसेच फोटो पब्लिश करू नये असे आव्हान केले व अभ्यासाकडे लक्ष द्यावे . असे मार्गदर्शन केले
तसेच सर्व विद्यालयातील सीसीटीव्ही तक्रार पेटी या संदर्भात चेकिंग करण्यात आली.
शिक्षक शिक्षिका यांना भेटी देऊन काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे भरोसा टीमच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व विद्यालयाची वतीने भरोसा दामिनी पथकाचा सन्मान करण्यात आला.

Back to top button