बीड
आमदार विजयसिंह यांच्या विरोधात फुसकी हाक देवून गेवराई तालुक्यातील जनतेचा रोष वाढवला…

आमदार विजयसिंह यांच्या विरोधात फुसकी हाक देवून गेवराई तालुक्यातील जनतेचा रोष वाढवला…
विरोधात प्रतिक्रिया देवून ही संयमाने राहा -आ. पंडित यांची प्रतिमा उंचावली
कोळगाव बाळासाहेब घाडगे – संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचं जे काही गरजवंत मराठा बांधवांसाठीचा न्याय हक्कासाठी जो लढा आहे. त्या लढाई ला पाठिंबा आहे. असे सांगणारे डॅशिंग आमदार विजयसिंह पंडित आहे. आणि संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या दि.२९ ऑगस्ट रोजी च्या चलो मुंबई चलो मुंबई आंदोलनाचे होर्डिंग लावले म्हणून ओबीसी मराठा वाद लागत आहे असे बेताल अन् फुसकी हाक देवून गेवराई तालुक्यातील जनतेचा प्रा लक्ष्मण हाके यांनी रोष राग वाढवला. असे सांगणे म्हणजे “दुखणं म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला” कारण गेवराई मतदार संघाचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित हे फक्त मराठा समाज बांधवांच्या मतदानावर निवडून आले नाही. कारण ओबीसी नेते स्वयंघोषित म्हणणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी गेवराई मतदार संघात ओबीसीचा उमेदवार उभा करून ओबीसी मराठा जातीवादी प्रचार करत निवडणूक लढवली होती. पण त्यांना त्यांच्या समाजातील लोकांनी त्यांची किंमत लायकी दाखवली होती. कारण अनेक ओबीसी बहुसंख्येने असलेल्या गाव वाडी तांड्यावर विजयसिंह पंडित यांना सर्वसमावेशक मताची लीड दिली होती. श्री पंडित यांनी सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन एकत्र येऊन निवडणूक लढवून जिंकली होती प्रा लक्ष्मण हाके यांनी विसरु नये.
पाकिट घेणाऱ्यांनी दंडुक्याची भाषा करु नये….
आ.विजयसिंह पंडित यांनी मुलाखती मधून सांगितले की, सध्या मराठ्यांसाठी जे आंदोलन मोठ होत आहे ते आता निर्णायक टप्प्यावर लढा आलेला आहे अखंड महाराष्ट्रातील जो आमचा मराठा समाज बांधव आहे गरजवंत मराठ्यांचा लढा त्या ठिकाणी अंतिम टप्प्यावर आलेला असताना आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात समाज बांधव लाखोंच्या संख्येने इथं आता शांतपणे निघालेला असताना याच्यामध्ये कुठेतरी खोडा घालायचा, काहीतरी गालबोट लावण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न आहे. आपल्याकडे मोकाट कुत्र्यांवर त्यांना पायबंध घालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. याला चार्ज केलं की हे पळायला लागतात. याचे हे जे काही षडयंत्र आहे.आणि त्यांनी दंडूक्याची भाषा करू नये.असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे. याला कुठेही थारा न देता आपण हे ओळखलं पाहिजे. कारण माझ्या भागातील लोकांनी याला ओळखले आहे. कारण याच्यापूर्वी मी अशाच पद्धतीने ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
……चौकट
ओबीसी समाज बांधवांची सुद्धा प्रा लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मते..
माझ्या गेवराई मतदार संघामध्ये हा गल्लीबोळामध्ये फिरला यांनी वंचित आघाडीचा उमेदवार पैसे घेऊन त्याच्याकडून त्याचा प्रचार केला. त्याची अवस्था काय झाली आहे ते निकालातून कळालेले त्याचे अनामत रक्कम जमा झाली. त्या उमेदवाराचं त्याला कुठेही लोकांनी याच्या षड्यंत्राला थारा दिला नाही. याविषयी संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकेयेकडे दुर्लक्ष करत एक प्रकारे विजयसिंह पंडित यांची पाठराखण केली आहे. यातून मराठा समाजाच्याच नाहीत तर आमच्या ओबीसी समाज बांधवांची सुद्धा प्रा लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मते देत आहे. यामधून लोकप्रिय सर्व समाज प्रिय आमदार म्हणून विजयसिंह पंडित यांची प्रतिमा उंचावली आहे.
…….चौकट
शांततेत राहण्यासाठी आव्हान करणारा आमदार नेता …
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी तीन चार दिवसांपुर्वी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. नव्हे तर दंडुक्याची अरे तोऱ्याची शिवीगाळ भाषा केली. निवडून आले तरीही तुला इलेक्शन मध्ये पाडू आमच्या ओबीसी ची किंमत दाखवू असे खुलेआम चॅलेंज करूनही विजयसिंह पंडित आमदार पंडित यांनी कुठेही विरोध केला नाही. उलट आपण शांततेची भूमिका घेत दोन्ही समाजात वाद पसरू नये .विरोध वाद होऊ नये. ओबीसी मराठा एकत्र राहावा यासाठी मतदारसंघातील आणि बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सामाजिक वातावरण बिघडू नये, शांततेत राहण्यासाठी आव्हान करणारा आमदार म्हणून विजयसिंह पंडित यांची प्रतिमा उंचावत आहे.मागील चाळीस वर्षापासून शिवाजीराव पंडित शिवछत्र कुटुंबीय मराठा आंदोलनात समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुढे होवून सहभागी होत आहे. तसेच तालुक्यातील इतर काही आमचे सर्व ओबीसी समाज बांधव आहेत त्यांच्या कुठल्याही अधिकाराला बाधा न पोचतात आमचा परिवार काम करत आहे. प्रा लक्ष्मण हाके फक्त एका हेतुसाठी दलाली करणारे आहे. आणि दलाली करून जे कोणी त्याला चार्ज करतो त्याच्यावर तो चालतो आणि ते कोण करतात ते मला माहितीये ते वेळ प्रसंगी पुराव्यानिशी दाखवून देईल असा इशारा दिला.
हेच ते होर्डिंग् आहे यावरून प्रा लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मराठा समाजात दंगली वाद लागत आहे असे वत्वव्य केलं.



