बीड

डवरी गोसावी समाजाची सखुबाई शिंदे बेघर भटके विमुक्त डवरी गोसावी समाजाची फसवणूक

डवरी गोसावी समाजाची सखुबाई शिंदे बेघर

भटके विमुक्त डवरी गोसावी समाजाची फसवणूक

अहिल्यानगर प्रतिनिधी – जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
यांना दि.१९ जून रोजी अहिल्यानगर येथे सखुबाई सर्जेराव शिंदे व त्यांच्या समाजातील भीमाबाई शिवाजी चव्हाण व कुटुंबातील सदस्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात पुढील मुद्दे मांडण्यात आले
बीड रोड, जामखेड येथील सर्वे नंबर ४६८, ४६८/१ गट क्र. १४१३/ब, क्षेत्र ३ हेक्टर ६० आर इतकी नाथपंथी डवरी गोसावी समाजाची मालकीची जमीन MIDC संस्थेने फसवून घेतली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी “नोकरी देतो, दहा गुंठे परत देतो” असे आश्वासन देऊन जमीन घेतली. मात्र ना नोकरी मिळाली, ना मोबदला दिला.
७/१२ वरून कुटुंबाचे नाव हटवले गेले.
सखुबाई विधवा असून, त्यांच्या कुटुंबात २२ सदस्य आहेत, त्यात चार दिव्यांग (मुकबधीर) मुलांचाही समावेश आहे.
उपजीविकेचा कोणताही आधार नाही. भिक्षा मागून जगणेदेखील आता अशक्य आहे.
दिव्यांग मुलांवर अनेकदा अत्याचार झाले – लाईटचा करंट देऊन अपमान व जीविताला धोका.
३० वर्षे झाले तरी जमिनीवर कोणतेही औद्योगिक काम झाले नाही.
सतीश पंढरीनाथ शिंदे व कांतीलाल मोतीलाल खिवंसरा यांनी ९९ वर्षाच्या बनावट भाडेपट्ट्यावर जमीन घेतली.
बोगस दस्तऐवज तयार करून कंपन्या दाखवल्या, प्रत्यक्षात काहीही अस्तित्वात नाही.
संबंधितांवर IPC कलम 420 (फसवणूक), 418 (खोटे दस्तऐवज), 506 (दमदाटी) आणि महाराष्ट्र जमीन महसूल व शेतजमीन अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी.
त्यांच्या कुटुंबाचे नाव ७/१२ मध्ये पुन्हा समाविष्ट करावे. मालकीची जमीन परत मिळावी व तेथे वहिवाट करण्याची परवानगी मिळावी. न्याय मिळाला नाही तर दि. ३ जुलै २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना निवेदनात देण्यात आली. संपूर्ण प्रकरणात सखुबाई शिंदे व त्यांच्या समाजाची जमीन बेकायदेशीरपणे एम आय डी सी संस्थेने व इतर संबंधितांनी घेतल्याचा आरोप असून, योग्य मोबदला न दिल्याने व जीवनावश्यक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांनी न्यायालयीन कारवाईसह आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Back to top button