बीड

तेलंगशी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा… (योगशिक्षक डाॅ.राजू म्हेञे व प्रतिक्षा म्हेञे यांनी दिले योगाभ्यासाचे धडे)

तेलंगशी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

(योगशिक्षक डाॅ.राजू म्हेञे व प्रतिक्षा म्हेञे यांनी दिले योगाभ्यासाचे धडे)

जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्सात आला.या वर्षीची थिम एक पृथ्वी,एक आरोग्य यासाठी योग (One Earth One Health) अशी असून वैयक्तिक कल्याण आणि ग्रहांचे आरोग्य अविभाज्यपणे जोडलेले आहे यावर हि थिम भर देते.

*एक दिवसीय योग शिबीराचे आयोजन…*
तेलंगशी शाळेत योग दिनानिमित्त या विशेष योग शिबीराचे आयोजन करण्यातआले. योगशिक्षक प्रा.डाॅ.राजू म्हेञे व प्रतिक्षा म्हेञे यांनी शास्ञोक्त पद्धतीने विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांना योगाभ्यासाचे धडे दिले.योग शिबीरात सूर्यनमस्कार,ञिकोणासन,भुजंगासन,धनुरासन,नावासन,पादहस्तासन,मयुरासन,गरुड शिर्षासन,ताडासन,वृक्षासन,सुखासन,अनुलोम विलोम यांसह अनेक योगप्रात्यक्षिके प्रत्यक्ष दाखवून ते सर्वांकडून करुन घेतले.सर्वांनी दररोज नियमितपणे योगा करण्याचा कानमंञ दिला.सकारात्मक,आरोग्यसंपन्न व शांतीमय जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाची गरज असल्याचे मत योगशिक्षक डाॅ.राजू म्हेञे यांनी व्यक्त केले.

*तेलंगशी ग्रामस्थांचा योग शिबीरास उत्सफूर्त प्रतिसाद..*
११व्या आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबीरास SMCअध्यक्ष रेवननाथ ढाळे,ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे,SMC सदस्य अण्णा काळे,संदिप जायभाय,मुकेश मोरे,विजय जाधव,मच्छिंद्र कोयले,तुकाराम ढाळे,राजेंद्र ढाळे,चौरे,सखाराम ढाळे,रमेश जायभाय,एकनाथ जायभाय,डाॅ.अमोल मुसळे,आरोग्यसेविका श्रीम.दराडे,मुख्याध्यापक संतोष गोरे यांच्यासह सर्व शिक्षकांनी योगाचे धडे घेतले.

*योग शिबीर यशस्वीतेसाठी टिम तेलंगशीने घेतले परिश्रम…*
या योग शिबीर यशस्वीतेसाठी टिम तेलंगशीने विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशेन चेंटमपल्ले,सूञसंचलन विजयकुमार रेणुके तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संतोष गोरे यांनी केले.लक्ष्मी जायभाय,अशोक जाधव,रविंद्र धस व विकास पाचरणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

*तेलंगशी शाळेच्या योग शिबीराचे सर्वञ कौतुक…*
जि.प.च्या शाळेत प्रथमच अशा प्रशिक्षित योग शिक्षकांकडून योग शिबीराचे आयोजन केल्याने शाळेचे सर्वञ कौतुक होत आहे.गटशिक्षणाधिकारी प्रदिप चव्हाण साहेब,विस्तार अधिकारी जालिंदर खताळ साहेब व केंद्रप्रमुख केशव गायकवाड साहेब यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी योग दिनाच्या प्रभावी आयोजनाबद्दल शिक्षक व व्यवस्थापन समिती यांचे विशेष कौतुक केले आहे.

Back to top button