बीड

ल.ना.होशिंग विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

ल.ना.होशिंग विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

जामखेड (२१ जून २०२५) :दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य व योग शिक्षक बाळासाहेब पारखे यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना योगासने करून योगाची प्रात्यक्षिके सादर केली.जागतिक योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. याचे उद्दिष्ट म्हणजे जगभरात योगाची माहिती, प्राचीन भारतीय परंपरेचे जतन व प्रचार, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुण चिंतामणी, तहसीलदार गणेश माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ,केंद्रप्रमुख नवनाथ बडे,ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे, राजेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, प्रा. युवराज भोसले, राजेंद्र कोहक, पांडुरंग वराट, विश्वनाथ आघाव, अजिनाथ शिरसाट, ज्येष्ठ शिक्षक भरत लहाने, बबन राठोड, पोपट जगदाळे,ईश्वर कोळी,एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, कलाशिक्षक मुकुंद राऊत, कैलास वराट, विशाल पोले, रोहित घोडेस्वार, हनुमंत वराट, उमाकांत कुलकर्णी, संतोष देशमुख, प्रल्हाद साळुंखे, धीरज पाटील, बाप्पू जरे, साई भोसले तसेच समारंभ प्रमुख आदित्य देशमुख यांच्यासह महिला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*योग व्यायामाचे महत्त्व*

योगामुळे शरीर लवचिक, तंदुरुस्त व मजबूत होते.श्वासावर नियंत्रण मिळाल्यामुळे मन शांत व एकाग्र राहते.नियमित योगासन व प्राणायाम केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.मानसिक ताणतणाव कमी होऊन आनंदी जीवन जगता येते.शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Back to top button