ब्रेकिंग

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

सुपरस्टार रजनीकांत यांना आज चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मनाला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एका मोठा आनंद सोहळा मानला जात आहे.

रजनीकांत यांनी आपला पुरस्कार ‘गुरू आणि गुरू’ के बालचंदर यांना समर्पित केला. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. या सोहळ्याआधी रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

मात्र यावेळी त्यांनी एका गोष्टीचे दुःख व्यक्त केले होते. मी खूप आनंदी आहे की मी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मला हा पुरस्कार मिळेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला वाईट वाटले की, केबी सर (के बालाचंदर) आपल्यात नाही.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या चार दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Back to top button