वैजिनाथ पोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

वैजिनाथ पोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
जामखेड प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांचे विश्वासू आणि प्रामाणिक कार्यकर्ते वैजिनाथ साहेबराव पोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी आमदार रोहित पवार यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.
वैजिनाथ पोले हे गेल्या ४५ वर्षांपासून शरद पवार यांच्या विचारांचे कट्टर शिलेदार असून, प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते आमदार रोहित पवार यांचे फायर ब्रॅण्ड कार्यकर्ता म्हणून प्रत्येक जनसभेत तळमळीनं प्रस्ताव मांडत असतात. पक्ष स्थापनेपासून त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदांवर काम केले आहे.
वैजिनाथ पोले यांना निवडीचे पत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शहाजी राळेभात, विजयसिंह गोलेकर, राजेंद्र पवार, सुर्यकांत मोरे, दत्तात्रय सोले पाटील, कुंडल राळेभात, अमोल गिरमे, अनिल रेडे, सचिन भोरे, नितीन भोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीबद्दल जेष्ठ नेते अशोक शिंगवी, अभय शिंगवी (जैन अल्पसंख्याक विकास महामंडळ, विभागीय सह-समन्वयक), अॅड. अशोक थोरात, कोंडिबा महारनवर (सर), प्रकाश थोरात, आण्णा देवमुंडे, अर्जुन देवमुंडे, रावसाहेब श्रीरामे, विजय पावणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल पोले यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात कौतुक होत आहे.



