बीड
कल्याण-विशाखापट्टणम हायवे (NH-61) हा अपघाताचा हाॅटस्पाॅट …

कल्याण-विशाखापट्टणम हायवे (NH-61) हा अपघाताचा हाॅटस्पाॅट …
जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात…!
कोळगाव, दि.०९ बाळासाहेब घाडगे – गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ६१ वर काल रात्री दि.०८ मे २०२६ रोजी झालेल्या मोटारसायकल व कंटेनर अपघातात शिरुर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथिल दाम्पत्य जागीच ठार झाले आहे, त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग अपघातचा हाॅटस्पाॅट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली जात असून चकलांबा पोलिस स्टेशन च्या वतीने पंचनामा करण्यात आला. यावेळी अपघातातील व्यक्तींना कळवा तांदळा काजळा परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत आणि सहकार्य केले.
गेवराई तालुक्यातुन जाणारा कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील पाथर्डी ते पाडळशिंगी दरम्यान सुरू असलेले काम सध्या प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे साठेवाडीफाटा कोळगाव ते तांदळा तिंतरवणी या दरम्यान दोन ठिकाणे हे अपघाताचे हाॅटस्पाॅट ठरत आहेत. वारंवार होणारे अपघात आणि रस्ते बांधणीतील तांत्रिक त्रुटींमुळे हा हायवे आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.अनेक वेळा अपघात होवुन ही प्रशासन देखल देत नाही, त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे थरारक झाले आहे,जिल्हा प्रशासनास लेखी निवेदन देवुन ही दखल दिली जात नसल्याचे खंत सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार ओंकार शेंबडे व्यक्त केली आहे. काल रात्री दि.०८ मे २०२६ रोजी झालेल्या मोटारसायकल व कंटेनर अपघातात शिरुर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथिल दाम्पत्य जागीच ठार झाले आहे, त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग अपघातचा हाॅटस्पाॅट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार ओमकार शेंबडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर नेमका प्रकार काय होत आहे ,मिळालेल्या माहितीनुसार, या महामार्गाचे काम टी.एन.टी. इन्फ्रास्ट्रक्चर (पुणे) या कंपनीकडे आहे. रस्ते बांधणीच्या नियमांनुसार रस्त्याच्या कडेला असलेला ‘साईड पंखा’ (Shoulder) २.५ मीटर असणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी तो केवळ १.५ मीटर भरला असून त्यातही मुरमाऐवजी मोठमोठाले दगड वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
प्रशासकीय अनास्था आणि कंपनीची मुजोरी
संबंधित कंपनीचे अधिकारी साईटवर उपलब्ध नसतात आणि फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेष म्हणजे, पाडळशिंगी जवळ नुकताच तयार झालेला रस्ता दोन ते तीन इंच खचल्याचे धक्कादायक वास्तव आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न:
पत्रकार ओमकार शेंबडे यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर आता काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निकृष्ट काम करणाऱ्या टी.एन.टी. इन्फ्रास्ट्रक्चर पुणे या कंपनीवर प्रशासन दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करणार का? गुन्हा दाखल होणार का?: सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल होणार का? मदत आणि भरपाई: या मार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना आणि जखमींना आर्थिक मदत मिळणार का?
निवेदनाचे देवून अधिकारी गप्प झाले का.?:
कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघात होतात. याविषयी दि.२० एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत?
“आम्ही वारंवार निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन ढिम्म आहे. हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे असून अपघात वाढले आहेत. जर तातडीने सुधारणा झाली नाही आणि संबंधित कंपनीवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ओमकार शेंबडे यांनी दिला.
मृत्यूच्या सापळ्या’तून प्रवाशांची सुटका कधी अँड कृष्णा लोंढे कोळगावकर
शिरुर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथिल दाम्पत्य बाबु रामभाऊ बळे वय ५८ वर्ष त्यांची पत्नी सौ,मंगल बाबु बळे वय ५४ वर्ष हे मोटारसायकल क्रमांक एम एच -१४, सी. झेड ७२०९ हीस एम एच – ४२ बी एफ ७७९० या नंबर च्या मोठ्या कंटेनर ने फरफटत नेले . यामध्ये मोटारसायकल चे दोघे जागीच ठार झाले आहेत. घटनास्थळी पंचनामा चकलांबा पोलिसाच्या वतीने जमादार राम बारगजे यांनी केला. या अपघाताबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि या ‘मृत्यूच्या सापळ्या’तून प्रवाशांची सुटका कधी होते, प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अँड कृष्णा लोंढे कोळगावकर यांनी केला. या अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



