बीड

बीड बाजार समितीचे माजी सभापती आश्रुबा रसाळ यांचे 91 व्या वर्षी निधन

बीड बाजार समितीचे माजी सभापती आश्रुबा रसाळ यांचे 91 व्या वर्षी निधन

मांजरसंभा प्रतिनिधी – मांजरसुंबा येथील रहिवासी तथा बीड बाजार समितीचे माजी सभापती अश्रोबा रसाळ यांचे 91 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते गोरक्ष रसाळ व मांजरसुंबा ग्रामपंचायतचे सरपंच अरुण काका रसाळ यांचे वडील होते. त्यांच्या जाण्याने बीड तालुक्यासह मांजरसुंबा परिसरात शोककाळा पसरली आहे, त्यांचा बीड तालुक्यातील राजकारणात खूप मोठा दबदबा होता..
याबाबत अधिक माहिती अशी की मागील एक महिन्यापासून आश्रुबा रसाळ हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते त्यांची तब्येत खूपच खालावलेली होती, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले निधन झाल्याची बातमी बीड तालुका व मांजरसुंबा परिसरात समजल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 4 वाजता त्यांच्या मूळ गावी मांजरसुंबा येथे करण्यात येणार आहे , त्यांच्या पश्चात चार मुलं सुना नातवंडे असा खूप मोठा परिवार आहे. रसाळ कुटुंबियांच्या दुःखात दैनिक सूर्योदय परिवार सहभागी आहे…

Back to top button