📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बारावी परीक्षेत अनुष्का गुलाटी ठरली गुणवत्तेची मानकरी

बारावी परीक्षेत अनुष्का गुलाटी ठरली गुणवत्तेची मानकरी

८८.८३% गुणांसह प्रेमराज सारडा कॉलेजात तिसरा क्रमांक ; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

जामखेड प्रतिनिधी – अहिल्यानगर येथील हिंद सेवा मंडळाचे प्रेमराज सारडा कॉलेजमधील बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत कु.अनुष्का स्मिता विशाल गुलाटी हिने ८८.८३%
टक्के गुण मिळवत कॉलेजात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल कॉलेजमध्ये आणि जामखेड परिसरातून तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अनुष्का ही जामखेड शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक राजेंद्र उर्फ (पप्पूशेठ) ग्यानचंद गुलाटी यांची नात असून,सौ.स्मिता विशाल राजेंद्र गुलाटी यांची कन्या आहे. अत्यंत अभ्यासू, शांत स्वभावाची आणि मेहनती अनुष्कानेशिक्षणात सातत्य ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

आपल्या यशाचे श्रेय तिने शिक्षक, पालक आणि परिवाराच्या प्रोत्साहनाला दिले आहे. यशाच्या पायऱ्या चढताना आई-वडिलांनी दिलेले मार्गदर्शन अनमोल असल्याचेही ती नमूद करते.

या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने इतर विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

Back to top button