महाराष्ट्र

आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑइल

आमदार प्रशांत परिचारक यांनी पूर्वी एका प्रचार सभेत केलेल्या वादग्रस्त विधानावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. सैनिक सीमेवर लढतात आणि त्यांना गावाकडे मुले कशी होतात असं वादग्रस्त विधान परिचारक यांनी केले होते.
त्या विधानाचा निषेध आज एका माजी सैनिकाने नोंदविला.

आज बार्शी येथे एका कार्यक्रमासाठी परिचारक निघाले होते. त्यांची गाडी (रिधोरे ता. माढा) येथे एका माजी सैनिक तरुणाने अडविली. ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ असा घोषणा देत त्याने गाडीवर काळे ऑइल फेकले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. परंतु परिचारक व कार्यकर्ते यांनी विषय न वाढवता पुढे कार्यक्रमासाठी मार्गक्रमण केले.

Back to top button