मुंबई

प्रधानमंत्री मोफत लॅपटॉप वितरण योजनेबद्दलचा व्हायरल मेसेज ठरला फेक

 

नवी दिल्ली | व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत असून या मॅसेजमध्ये त्यात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याच्या आनंदात मेक इन इंडियाअंतर्गत 2 कोटी तरुणांना मोफत लॅपटॉप देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत ३० लाख तरुणांनी यशस्वीपणे अर्ज केले आहेत, आता तुमची पाळी आहे. शेवटच्या तारखेपूर्वी लवकरात लवकर तुमचा अर्ज सबमिट करा. तो फेक मेसेज असल्याचे निष्पन्न झाले. मोदी सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. या दिशाभूल करणाऱ्या संदेशात देशातील लाखो तरुणांनी मोफत लॅपटॉपसाठी यशस्वीपणे अर्ज केल्याचा दावा करण्यात आला आहे.

खोटी माहिती काढून टाकताना, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने केलेल्या तथ्य तपासणीत असे आढळून आले आहे की व्हायरल मेसेज खोटा आहे. हा दावा खोटा असल्याचे PIB फॅक्ट चेकमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. केंद्र सरकारकडे अशी कोणतीही योजना नाही. तसेच ब्युरोने सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि असे संदेश शेअर किंवा फॉरवर्ड करू नका, असे आवाहनदेखील केले आहे. PIB ही भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम उपक्रम आणि उपलब्धी याविषयी वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती देणारी मुख्य संस्था आहे.

PIB फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरण/योजना/विभाग/मंत्रालयांबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते.

Back to top button