बीड

जागतिक योगदिनानिमित्त जामखेडमध्ये मोफत योग शिबिर

जागतिक योगदिनानिमित्त जामखेडमध्ये मोफत योग शिबिर

शंभुसूर्य संस्थेचा आरोग्यदायी उपक्रम; पाच दिवसांचे योग शिबिर

जामखेड : जागतिक योगदिनाचे औचित्य साधून श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक १७ ते दिनांक २१ जून दरम्यान ८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव, सकस आहाराची कमतरता आणि वाढता लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर मुलांना योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार आणि सुसंस्कारांचे महत्त्व पटवून देण्यासाठी संस्थेने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.योगाचे महत्त्व अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावे, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीची सवय लागावी, या उद्देशाने पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

शिबिर पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संतोष (बबलू वस्ताद) टेकाळे (९८२२२७७३५७), अमोल निमोणकर (९९७५१८६३७५) व आकाश टेकाळे (७७६७९९६९९५) यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था गेल्या १६ वर्षांपासून वृक्षारोपण, मंदिर स्वच्छता, मर्दानी खेळ प्रशिक्षण, मल्लखांब प्रशिक्षण शिबिरे तसेच विविध सामाजिक व राष्ट्रोपयोगी उपक्रम राबवत आहे.

Back to top button