बीड

सामाजिक सलोख्याचा संदेश देत नितीन देवकते यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

सामाजिक सलोख्याचा संदेश देत नितीन देवकते यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

ह.भ.प. सुरेशानंद महाराज व माऊली महाराजांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या सेन्टेन्स कट्टा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे मा. नितीन देवकते यांचा वाढदिवस उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त सदस्यांनी एकत्र येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.
सेन्टेन्स कट्टा हा ग्रुप केवळ गप्पांचा मंच नसून, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर, शिक्षक आणि व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींना जोडणारे सामाजिक व्यासपीठ आहे. सामाजिक बांधिलकी जपत या ग्रुपमार्फत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
ग्रुपचा उद्देश सामाजिक एकोपा जपणे, शैक्षणिक चर्चांना चालना देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. या उपक्रमांमध्ये मा. नितीन देवकते यांचे नेतृत्व नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.
वाढदिवस सोहळ्याला ह.भ.प. सुरेशानंद महाराज कोळेकर व  माऊली महाराज सजगणे  यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या आशीर्वचनांनी कार्यक्रमाचे वातावरण अधिकच मंगलमय झाले.
कार्यक्रमास लोळदगावचे सरपंच अजय नाना घोडके, प्रा. डॉ. लक्ष्मण तोंडाकुर, राजवर्धन दादा घोडके, नागेश अंधुरे, विवेक शिंदे, इंजि. अतुल शेंडगे, डॉ. किशोर वरपे, डॉ. दहिफळे, अमर पवार, अविनाश लांडे, नितीन मिटकर, शिवाजीराव आमटे, गणेश बनसोडे, पंडित ठोसर, अमर ढोणे, धनंजय काळे, बालाजी पवार, संतोष खरसाडे, संतोष पवार, संजय लकडे, संजय मोहिते श्रीकृष्ण खुटाळे, गोरख भडके, दिपक ढाकणे तसेच गावातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
प्रसंगी नितीन देवकते म्हणाले, “सेन्टेन्स कट्टा हा फक्त ग्रुप नाही, तर समाजातील विचारशील लोकांना जोडणारे कुटुंब आहे. या परिवारातून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवले जातील.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकोप्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प करत देवकते साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या

Back to top button