बीड
गरजू नागरिकांना कपड्यांचे वाटप : नवगण महाविद्यालयाची माणुसकीची भिंत उपक्रमातून सेवा

गरजू नागरिकांना कपड्यांचे वाटप : नवगण महाविद्यालयाची माणुसकीची भिंत उपक्रमातून सेवा
परळी – नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे “माणुसकीची भिंत” या स्तुत्य उपक्रमांतर्गत गरजू आणि निराधार नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
वैद्यनाथ मंदिर पायरी परिसरातील गरजूवंत तसेच परळी रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना शाल,साडी, ब्लँकेट, जुने कपडे आणि अन्य आवश्यक कपड्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत महाविद्यालयाने घेतलेली ही पुढाकार स्थानिक पातळीवर प्रशंसनीय ठरत आहे.
या उपक्रमात उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन झांजे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण आणि संवेदनशीलता विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करीत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



