मुंबई

मोठी बातमी | वसईत सेनेच्या १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांत जोरदार इनकमिंग सुरु झालेली असताना मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षाला फटका बसताना दिसून येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता वसईत शिवसेना पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.

वसईत शिवसेनेच्या १५० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे सेनेत मोठी खळबळ उडाली आहे. या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या आढावा बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून लांब ठेवले जात असून इतर पक्षातून आलेल्याना जवळ केले जात असल्याचे कारण देत वसई सेनेच्या १५० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

सामूहिक राजीनामा दिलेल्या मध्ये बोईसर विधान सभा समन्वयक अजित भोईर, उपतालुका प्रमुख काकासाहेब मोटे , विभाग प्रमुख शरद गावकर, युवा सेनेचे धनंजय मोहिते यांच्या सह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पूर्वपट्टीत खळबळ उडाली आहे.

Back to top button